Loading..

आमचे यशस्वी विदयार्थी

सुबोध भावे
लहानपणापासून ते कॉलेजमधे गेल्यावर सुद्धा मी संस्थेच्या नाटकात काम करत होतो. माझ्या अभिनयाच्या वाटचालीत नाटयसंस्कारचे व पारखी सरांचे बहुमुल्य योगदान आहे.
सोनाली कुलकर्णी
पाचवीत असल्यापासून सायकलवर मी मे महिन्याच्या सुट्टीतील नाट्य कार्यशाळेत जायचे. पारखी सरांनी तेव्हापासून जे अभिनयाचे , नाट्याचे संस्कार आमच्यावर केले आहेत त्याचा पुढे आयुष्यभर उपयोग होत आहे .
योगेश सोमण
माझे पहिले नाट्य गुरु पारखी सर. माझी सुरुवात नाट्यसंस्कार मध्ये झाली. सातत्य आणि चिकाटीने गेली अनेक वर्ष नाट्यसंस्कार संस्थेचे कार्य सुरू आहे.
शिवानी रांगोळे
लहानपणापसुन अभिनयाचे संस्कार हे नाटयसंकार कला अकादमी मधेच झाले.दिवाकर स्मृती नाटयछटा स्पर्धेत १ली पासून अनेक वर्ष सहभाग घेतल्यामुळे आत्मविश्वास वाढला.
प्रियदर्शनी इंदलकर
शालेय वयापासून नाट्य कार्यशाळेमध्ये सहभाग घ्यायचे. संस्थेच्या ढब्बू ढोल रिमोट गोल या बालनाट्यात भूमिका सादर केली .त्याचे प्रयोग पुण्यात तसेच सातारा कोल्हापूर मिरज अशा वेगवेगळ्या गावी झाले . त्यामुळे एक समृद्ध अनुभव मिळाला.
अथर्व कर्वे
वयाच्या पाचव्या वर्षी नाट्य शिबिरात सहभाग घेतला होता. दरवर्षी आईने लिहिलेल्या नाट्यछटा संस्थेच्या दिवाकर स्मृति नाट्यछटा स्पर्धेत सादर केल्या. पारखी सरांनी कलेचा पाया पक्का केला त्यामुळे आज कोणतीही भूमिका साकारताना दडपण येत नाही.
सक्षम कुलकर्णी
आईशप्पथ आणि ढब्बु ढोल रिमोट गोल या संस्थेच्या २ अंकी बालनाट्यातून माझ्या अभिनयाची सुरुवात झाली. नाटयसंकारमध्ये मी जे कही शिकलो ते आजही शिदोरितून काढुन मी माझ्या क्षेत्रात वापरतो. ( पक पक पकाक, दे धक्का, शिक्षणाचा आईचा घो, दे धक्का २ असे अनेक मराठी चित्रपट, - आंबट गोड , लव्ह लग्न लोचा , पॅडेड कि पुषप अश्या अनेक मालिका.)
गायत्री दातार
2003 साली इयत्ता तिसरीत असताना मी नाट्यसंस्कारच्या उन्हाळी शिबिरात गेले होते. तिथे होणारे नाट्य खेळ ,गाणी, अभिनय करताना मला खूप मज्जा आली. आणि दरवर्षी सुट्टीमध्ये मी शिबिरात जाऊ लागले. एका वर्षी सुबोध भावे संस्थेचा माजी विद्यार्थी कार्यक्रमात पाहुणा म्हणून आला होता .पारखी सरांनी मला त्याची मुलाखत घ्यायला सांगितली. आणि काय योगायोग पुढे कित्येक वर्षांनी तुला पाहते रे मालिकेमध्ये त्याची नायिका होण्याचे भाग्य लाभले
सुरज पारसनिस
पाचवी - सहावी पासून दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत संस्थेच्या शिबिरात येऊन धमाल करायची . एकदा पारखी सरांनी सांगितलं तू या नाटकाचे दिग्दर्शन करायचं. ,येस वुई वॉन्ट चार्ली या बालनाट्याच मी दिग्दर्शन केलं आणि माझ्यातला दिग्दर्शक पारखी सरांनी जागा केला. (लेखक , दिग्दर्शक, अभिनेता )
शिवराज वायचळ
इयत्ता आठवीत असताना उन्हाळी शिबिर केलं आणि आज अभिमान वाटतोय या क्षेत्रात काम करताना जे उत्तम कलाकार सोबत आहेत त्यातील अनेक जण नाट्यसंस्कार परिवारातील आहेत. योग्य वयात नाट्याचे संस्कार झाले , याचा आता काम करताना खूप फायदा होतो .पारखी सरांनी अनेक बेसिक गोष्टी शिकवल्या.( भंवर, मिकी , एनेथेमा , उडाळगड्डी हि नाटके - वेडींगचा शिनेमा , अगबाई अरेच्या २ , फुंतरू हे मराठी सिनेमे )
अमित फाळके
मी दुसरी-तिसरीत असताना भावे प्राथमिक शाळेत सरांनी शिबिर घेतलं होतं. त्यानंतर नाट्यसंस्कार तर्फे कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धेमध्ये मोठे झाले छोटे या प्रदीप जंगम लिखित नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केली. नाटक प्रथम, अभिनय प्रथम मला अशी अनेक बक्षीस त्या नाटकाला मिळाली. थिएटर काय असते याचे बाळकडू पारखी सरांनी दिले. त्याकरता सरांचे आम्ही आयुष्यभर आभार मानले पाहिजेत. पारखी सरांनी महाराष्ट्रात तंत्रज्ञ आणि कलाकारांची एक फळी घडवली आहे .काही लोक पडद्यामागे आहेत ,काही पडद्यावर आहेत त्यांच्या मागे पारखी सरांचे संस्कार आहेत. हे काम असच अविरत चालू राहू दे.
चिन्मय पटवर्धन
माझी नाटक या क्षेत्राशी नाट्यसंस्कारने नीट ओळख करून दिली .लहानपणी आई-बाबांनी मला शिबिरात घातलं आणि अभिनय नाटक याच्याशी माझं नातं या संस्थेमुळे जोडले गेले. फिल्म इन्स्टिट्यूटच्या एका फिल्ममध्ये पारखी सरांनी माझं नाव सुचवलं. आणि त्या कामामुळे मला युवराज नावाचा मोठा हिंदी चित्रपट मिळाला. (स्वामिनी मराठी मालिका , सूर सपाटा मराठी चित्रपट)
लोकेष गुप्ते
सुबोध भावे आणि मी जेव्हा शूटिंग च्या सेटवर भेटतो तेव्हा हमखास विषय निघतो तो नाट्यसंस्कार संस्थेचा. नाट्यसंस्कार मध्ये असताना आलेले अनुभव गमतीजमती हा मुख्य विषय असतो. अचानक काही वर्षांनी माझा मुलगा जेव्हा नाट्यछटा स्पर्धेत सहभागी झाला, तेव्हा पारखी सरांची गाठ पडली खूप आनंद झाला. आता दुसरी पिढी नाट्यसंस्कार घेण्यासाठी सामील झाली.
मंगेश शिंदे
नाटयसंस्कार मूळे मला नाटय क्षेत्रातल वेळेच महत्व कळाल आणि त्याचा उपयोग पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करताना झाला. नाटकासाठी आस असणार्याना सक्षम करणारी संस्था म्हणजे नाट्यसंस्कार कला अकादमी.
ओंकार गोखले
नाटक या विषयाची आवड निर्माण होण्याची क्रिया नाट्य संस्कार मुळेच घडली .आणि त्यामुळेच अभिनयाबरोबरच दिग्दर्शन आणि लेखना मध्येही काम करायची प्रेरणा मिळाली. नाट्यसंस्कार ने सादर केलेल्या खेळता खेळता नाटिकेतील भूमिकेसाठी राज्य बालनाट्य स्पर्धेत रौप्य पदक मिळाले. दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय बाल नाट्य महोत्सवात काम करण्याची संधी मिळाली . आणि तिथे इतर देशातीलही नाटके बघायची संधी मिळाली आणि हे सारं नाट्यसंस्कार संस्थेमुळे.

प्रशिक्षण , प्रयोग , प्रकाशन

प्रशिक्षण , प्रयोग , प्रकाशन

नाटय प्रशिक्षण  –  एप्रिल व मे मध्ये १५ दिवसांच्या नाटय कार्यशाळा होतात.

रविवार सत्र नाट्य कार्यशाळा  – महिन्याच्या प्रत्येक रविवारी म्हणजे जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर आणि     ऑक्टोबर,नोव्हेंबर,डिसेंबर असे 3 महिन्याचे रविवार सत्र घेतले जाते. 

वयोगट –

  • छोटा गट ५ ते ८ वर्ष 
  • मोठागट ९ ते १६ वर्ष

अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,ललित कला केंद्र व नाट्यसंस्कार कला अकादमी संयुक्त विद्यमाने आयोजीत

🎓 अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम 

  • 4 महीने, प्रत्येक शनिवार व रविवार दुपारी 2 ते 6
  • वयोगट : 18 वर्षावरील सर्वांसाठी
  • शैक्षणीक  पात्रता* :-  12 वी उत्तीर्ण

नाटयसंस्कार कला अकादमी नाटय प्रयोग

संस्थेने केलेल्या हजारो बालनाट्यांपैकी काही निवडक बालनाट्ये: 

  1. लबाड लांडगा
  2. मंग्या गारूडी आणि जादूची पुंगी
  3. चोर चोर पक्का चोर
  4. पोलीस मामा राम राम
  5. सिंहगडाला जेव्हा जाग येते
  6. भित्रा राजपुत्र
  7. बिन कपड्याचा राजा
  8. डम डम डंबोला
  9. येस वुई वॉन्ट चार्ली
  10. आईशप्पथ
  11. ढब्बू ढोल रिमोट गोल
  12. जीर्णोधार
  13. आजोबांच्या धम्माल गोष्टी
  14. आजोबांच्या घरी रोबोट आणि परी
  15. कठपुतली
  16. नाच रे मोरा (ग .दि .माडगूळकरांच्या जीवनावरील संगीत, नृत्य,
    नाट्य) बालनाट्यांचे अनेक प्रयोग पुणे शहर परिसर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सादर
    केले.
  17. जयोस्तुते (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जिवनावर
    आधरीत नाटय नृत्य आणि सांगितीक महानाट्य) ७ जुलै व १३ जुलै ला या क्रांती नाट्याचा शुभारंभाचा
    प्रयोग झाला.
  18. सर्वात गाजलेल्या आणि 22 वर्षे चाललेल्या ढब्बू ढोल रिमोट गोल या
    बालनाट्याचा प्रयोग क्रमांक 99 मध्य प्रदेशातील इंदोर येथे झाला. आणि 27 नोव्हेंबर रोजी यशवंतराव
    चव्हाण नाटयगृह पुणे येथे शंभरावा प्रयोग झाला. शंभराव्या नाट्यसंमेलनात चिंचवड येथे या नाटकाचा
    प्रयोग क्रमांक 101 झाला.

बाल रंगभूमीची चळवळ नाट्यसंस्कारने तीन प्रकारे केली प्रशिक्षण, प्रयोग आणि सर्वात महत्त्वाचे प्रकाशन! बालनाटिकांची पुस्तके प्रकाशित करणे हे कोणत्याही प्रकाशकाला अवघड असते .कारण इतर पुस्तकाप्रमाणे त्याची विक्री होत नाही .पण चांगल्या बालनाटिका आणि नाट्यछटा या प्रकाशित झाल्या तरच त्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभरातील रसिकांना करता येतील. हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून नाट्य प्रतिमा प्रकाशन सुरू करण्यात आले .41 बालनाटिका 15 च्या वर नाट्यछटांची पुस्तके 2 नाट्यशास्त्र 6 नाटुकल्यांची पुस्तके प्रकाशित केली. बहुरंगी नाट्यछटा या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या झाल्या .तर नाट्यसंस्कार या नाट्यशास्त्राच्या सात आवृत्त्या झाल्या. आता प्रारंभिक नाट्यशास्त्र या नावाने नवीन आवृत्ती आली आहे. प्रकाशनाच्या या चळवळीमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर बाल नाटिका, नाट्यछटा उपलब्ध झाल्या. नाट्यछटांच्या स्पर्धा अनेक ठिकाणी होऊ लागल्या आहेत ,ते केवळ बहुरंगी नाट्यछटा पुस्तक सगळीकडे उपलब्ध झाल्यामुळे.

प्रकाशनाचे हे अवघड काम अजूनही वेगळ्या पद्धतीने सुरू आहे.

नाटयसंस्कार कशासाठी

तुमचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी नाटय प्रशिक्षण आवश्यक आहे. 

केवळ रंगमंचावर चित्रपटात भुमीका करण्यासाठी नव्हे तर जगाच्या रंगमंचावर कोणतीही भुमीका प्रभावी करण्यासाठी नाटय प्रशिक्षण महत्वाचे आहे. 

अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, होणारच पण डॉक्टर, इंजीनीयर, वकील, शिक्षक, समाज सेवक, लोक प्रतिनीधी या कोणत्याही क्षेत्रात यशस्वीपणे काम करण्यासाठी लहानपाणापसुन प्रत्येकावर नाटयाचे संस्कार होणे गरजेचे आहे यासाठी १९७८ सालापासुन आम्ही अविरतपणे सर्वांना नाटयप्रशिक्षण देत आहोत. आमचे सर्व क्षेत्रातील यशस्वी विदयार्थी हिच आमच्या कार्याची ओळख आहे.