Loading..

आजोबांच्या धम्माल गोष्टी

 संकल्पना : प्रकाश पारखी, लेखन : राजश्री राजवाडे काळेदिग्दर्शन : अमोल जाधव.

 या नाटकाचा पहिला प्रयोग 8 मे 2016 रोजी साने गुरुजी स्मारक येथे झाला या बालनाट्याचेही दोन वर्षात रौप्य महोत्सवी 25 प्रयोग केले. 2023 आणि 2024 यावर्षीही या बालनाट्याचे प्रयोग सुरू आहेत.

नातवंडे मोबाईल साठी भांडत असतात आजोबा आजी भांडण सोडतात.  आमच्या लहानपणी असे नव्हते म्हणतात.आणि लहानपणच्या आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी नातवंडांना सांगू लागतात .आणि त्या गोष्टी नाट्यरूपाने मागे दिसू लागतात. ससा कासवाची शर्यत, बडबड बदक, राजा आणि माकड ,सिंह आणि उंदीर, भित्रा ससा अशा अनेक गोष्टी जंगलाच्या पार्श्वभूमीवर सादर होतात. एका गोष्टीतून दुसरी गोष्ट सुरू होते. त्यामुळे तीन वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांनाच काय, आई-बाबा आणि आजी-आजोबांना सुद्धा त्या आवडतात.