Loading..

अभ्यास नाट्य

नाट्यसंस्कार कला अकादमी या संस्थेतर्फे आंतर शालेय अभ्यासनाट्य स्पर्धा घेतल्या जातात.
शालेय शिक्षणामध्ये नृत्य, नाट्य, संगीत ,चित्रकला, शिल्पकला यांना खूप महत्त्व आहे. पण नाट्य नृत्य संगीत यासाठी शिक्षक उपलब्ध नसतात आणि सादरीकरणासही विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. नाटक तर सगळ्यात अवघड. रंगभूषा ,वेशभूषा, रंगमंच कुठून आणणार. त्यासाठीच वर्गनाट्यगृहाची संकल्पना अभ्यासक्रमात मांडली आहे. तरीही पालक आणि शिक्षक यांचा आग्रह अभ्यास आणि अभ्यास असल्यामुळे, अभ्यासनाट्य ही चळवळ सुरू केली आहे. नाटकासाठी वेगळा वेळ देता येत नाही. अभ्यासक्रमासाठीच वेळ पुरत नाही .अशी तक्रार असल्यामुळे अभ्यासनाट्य या संकल्पनेचे स्वागत झाले. अभ्यासाच्या विषयावर शिक्षकांनी 10 मिनिटाचे नाटुकले बसवावे आणि ते वर्गातच सादर करावे. पडदा नेपथ्य विंग्ज् या मुलांच्याच करायच्या. वर्गाचा फळा हा नाटकाचा मागील पडदा करायचा. हे नाटक सादर करणाऱ्या मुलांचा अभ्यास तर पक्का होतोच, पण पाहणाऱ्या मुलांचा अभ्यास अधिक मनोरंजक आणि अधिक परिणाम कारक होतो. यात मुलांचा सहभाग वाढत जातो. वर्गासमोर यायला लाजणारी मुले नेपथ्य म्हणून उभे राहता राहता बोलू लागतात .काही मुले अभ्यासनाट्य लिहू लागतात. दिग्दर्शन करू शकतात. खरंतर या चळवळीमुळे शिक्षकांचा अध्यापनाचा ताण कमी होऊन मुलांमध्ये आनंददायी शिक्षणाची सुरुवात होईल. अभ्यास नाट्य या एका उपक्रमामुळे इतर कलांचाही आपोआप त्यात समावेश होऊ शकेल. कारण नाटक म्हणजे साहित्य चित्रकला नृत्य संगीत सर्वच गोष्टी एकत्रित यामध्ये आल्या .त्यामुळे ज्या मुलांना गाण्याची आवड असेल ते या नाटकांमध्ये गातील ज्यांना चित्रकलेची आवड असेल ते रंगभूषा, नेपथ्य निर्मिती ,रंगमंच सजावट करू शकतील.
आमच्या संस्थेतर्फे अभ्यास नाट्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्यात या स्पर्धा होतात .प्रथम शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेतली जाते .त्यानंतर स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीत परीक्षक प्रत्येक शाळेत वर्गात जाऊन अभ्यास नाट्य पाहतात. आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यातील निवडक अभ्यासनाट्य रंगमंचावर सादर केली जातात . तीन गटांमध्ये या स्पर्धा होतात आणि प्रत्येक गटांमध्ये पारितोषिक दिली जातात .

  • गट 1 तिसरी चौथी .
  • गट 2 पाचवी ते सातवी .
  • गट 3 आठवी ते दहावी .

या विषयावर मार्गदर्शक पुस्तक आणि डीव्हीडी आहे.

प्रवेश घेण्यासाठी आजच 8484930335 व्हाट्सएप मेसेज करा