Loading..

नाटयसंस्कार द्वितीय परीक्षा

नऊ वर्षावरील व नाटयसंस्कार प्रथम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्वांना ही परीक्षा देता येईल. ही परीक्षा लेखी,  सादरीकरण, आणि वैयक्तिक चर्चा या स्वरूपात असेल. व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी साधन नाटक असल्यामुळे सर्वांनी नाट्यशास्त्र शिकले पाहिजे आणि जगाच्या रंगमंचावरील आपली कोणतीही भूमिका प्रभावी केली पाहिजे. या उद्देशाने मुलांना निरीक्षण परीक्षण आणि प्रक्षेपणाचा उपयोग करण्यासाठी नाट्यसंस्कार द्वितीय परीक्षा उपयुक्त आहे.

1.लेखी परीक्षा

या परीक्षेत १ तासाची लेखी परीक्षा असून प्रत्येकी एक गुण याप्रमाणे 30 पर्यायी objective प्रश्न असतील. लेखी परीक्षेकरिता 'प्रारंभिक नाट्यशास्त्र' या पुस्तकाचा वाचून अभ्यास करणे गरजेचे आहे त्यामुळे नाट्यशास्त्राचा सखोल अभ्यास केला जाईल व विद्यार्थ्यांना मराठी वाचनाची गोडी निर्माण होईल.

2. सादरीकरण

विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पाच मुलांचा गट करून त्यांना दिलेल्या विषयाप्रमाणे गटाने सादरीकरण करायचे आहे. यामुळे त्यांच्या कल्पनाशक्ती व विचारशक्तीचा उपयोग लेखन व दिग्दर्शनाकरिता होईल तसेच विद्यार्थ्यांमधील चर्चात्मक संवाद साधता येईल. या सादरीकरणातील अभिनयाला 30 गुण असतील.

3. वैयक्तिक चर्चा

सादरीकरणानंतर गटातील प्रत्येक विद्यार्थ्यांशी खालील मुद्द्यांवर परीक्षक संवाद साधतील.

  1. संवाद लेखनाचा विचार कसा केला?
  2. दिग्दर्शक म्हणून काय विचार केला?
  3. सादरीकरणासाठी रंगमंचावर काय साहित्य (नेपथ्य) वापरता येईल?
  4. वेशभूषा व रंगभूषा याचा काय विचार केला?
  5. पार्श्व संगीताचा काय विचार केला?
वैयक्तिक चर्चेमुळे विद्यार्थ्यांचा दिग्दर्शन, लेखन अथवा इतर कोणत्या गोष्टींमध्ये कल आहे हे समजण्यास मदत होईल. यातील प्रत्येक विषयाला म्हणजे लेखन दिग्दर्शन, नेपथ्य, वेशभूषा व रंगभूषा, पाश्व संगीत याला प्रत्येकी ६ गुण असे ३० गुण आहेत.

एकूण प्रभाव

सादरीकरण आणि वैयक्तिक चर्चा याचे रेकॉर्डिंग होईल यातून दिसणाऱ्या स्पष्ट शब्द उच्चार सभाधितपणा आत्मविश्वास प्रसंगावधान व सांघिकता या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन एकूण प्रभाव किती पडला याचा विचार करून विद्यार्थ्याला दहा पैकी गुण दिले जातील.
अशा तऱ्हेने ही 100 गुणांची परीक्षा असेल.

प्रवेश घेण्यासाठी आजच 8484930335 व्हाट्सएप मेसेज करा