नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धा 2020 सालापासून सुरू केल्या आहेत.
शंभर वर्षापूर्वी दिवाकरांनी नाट्यछटा हा प्रकार मराठी साहित्यात आणला आणि तो लोकप्रिय झाला. पण त्यानंतर दिवाकर नाट्यछटा स्पर्धेच्या निमित्ताने या प्रकारात पुनरुज्जीवन झाले.
१९९२ सालापासून दिवाकर स्पर्धेच्या निमित्ताने तीस वर्ष नाट्यछटा सादरीकरणा बरोबरच लेखनाच्या स्पर्धा घेतल्या गेल्या, 2020 वर्षापासून सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धा स्वतंत्रपणे घेण्यास सुरुवात झाली.
नाट्यछटा लिहिण्यापूर्वी नाट्यछटा म्हणजे काय याचा अभ्यास करावा. दिवाकरांच्या नाट्यछटा वाचाव्यात. आमच्या बहुरंगी नाट्यछटा या पुस्तकात नाट्यछटा लेखनाविषयी मार्गदर्शन आहे.
नियम व अटी
नाट्यछटा तीन ते पाच मिनिट कालावधीची असावी म्हणजे दीड ते अडीच फुलस्केप लेखन असावे.
नाट्यछटा कोणत्या वयोगटासाठी लिहिली आहे याचा उल्लेख करावा. कोणत्याही विषयावर नाट्यछटा लिहू शकता.
आपल्या नाट्यछटेला योग्य नाव द्यायचे आहे.
एकाच लेखकाने एका पेक्षा जास्त नाट्यछटा लिहिल्या असतील तर त्याने जेवढ्या नाट्यछटा आहेत तेव्हढ्या वेळा वेगवेगळे फॉर्म भरावे.
नाट्यछटा संपूर्णपणे स्वतःची असावी.
कुणाचीही नक्कल किंवा आधारित भाषांतरित नसावी .
सदर नाट्यछटा कोणत्याही लेखन स्पर्धेत पाठवलेली नसावी. पूर्णपणे नवीन याच स्पर्धेसाठी लिहिलेली नाट्यछटा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
सदर नाट्यछटा कोणत्याही पुस्तक अथवा मासिकात किंवा कोणात्याही Digital Platform वर अथवा कोठेही प्रकाशित केलेली नसावी.
नाट्यछटा शक्यतो टाईप करून पाठवावी किंवा स्वच्छ अक्षरात कागदावर लिहून त्याचा चांगला फोटो पाठवावा.
लेखकाच्या वयोगटानुसार ते फॉर्म मध्ये निवडायचे आहेत.
गट 1 - 9 ते 12 वर्षे
गट 2 - 12 ते 18 वर्षे
गट 3 - 18 ते 60 वर्षे
गट 4 - 60 वर्षावरील
एका mobile number वरून एकाच स्पर्धकाला सहभाग घेता येईल.
परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील , व तो स्पर्धकावर बंधनकारक राहील.
नाट्यछटा लेखन स्पर्धकासाठी रुपये 50 प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये एकापेक्षा जास्त नाट्यछटा पाठवू शकता.
प्रवेश घेण्यासाठी आजच 8484930335 व्हाट्सएप मेसेज करा