Loading..

ढब्बु ढोल रिमोट गोल

ढब्बू ढोल रिमोट गोल या बालनाटयाचा पहिला प्रयोग 12 एप्रिल 2001 रोजी भरत नाटय मंदिरात झाला. या बालनाट्याची संकल्पना प्रकाश पारखी यांची होती या बालनाट्याचं लेखन दिग्दर्शन केलं होतं विनिता पिंपळखरे यांनी. या बालनाटयाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

7 डिसेंबर 2003 या दिवशी भरत नाट्य मंदिरात रौप्य महोत्सवी  प्रयोग झाला .

12 एप्रिल 2009 रोजी  या नाटकाचा पन्नासावा प्रयोग भरत नाटय मंदिरातच झाला आणि या नाटकाचा 100 प्रयोग 27 नोव्हेंबर २०२३ या दिवशी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दिमाखात साजरा झाला. भरत नाटय मंदिर, बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण या नाटयगृहातून याचे प्रयोग झालेच, पण सारसबाग ताथवडे उद्यान अशा ऊद्यानातही झाले .पुण्याबाहेर जुन्नर, संगमनेर ,नाशिक, ठाणे, सातारा, कराड, इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, मिरज अशा महाराष्ट्रातील अनेक गावांमधून झाले.या बालनाट्यात आई आणि बाबा या भूमिका दिपाली निरगुडकर आणि प्रकाश पारखी यांनी जवळजवळ सर्व प्रयोगात केल्या. यामध्ये बालकलाकार म्हणून काम केलेले अनेक कलाकार आज चित्रपट दूरदर्शन मालिका गाजत आहेत उदाहरणार्थ सक्षम कुलकर्णी, प्रियदर्शिनी इंदलकर, ओमकार गोखले, सुरज पारसनीस इत्यादी.