Loading..

भालबा केळकर स्मृती करंडक

लहाणपणीच नाट्याची आवड निर्माण व्हावी या साठी दहा वर्षांच्या आतील मुलांनी १० मिनीटाचे नाटुकले सादर करावयाचे . या स्पर्धा १९९२ पासुन सुरु केल्या . प्राथमिक शाळा , बाल भवन आणि हौशी संघांनी याला खुप छान प्रतीसाद दिला . या निमित्ताने शिक्षकांसाठी लेखन कार्यशाळा तसेच नाट्याच्या इतर तंत्राचे मार्गदर्षन ही शिक्षकांना केले . अनेक नामवंत कलाकार या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणुन लाभले . या मध्ये डॉ. श्रीराम लागु , ललीता पवार , शरद तळवळकर , चित्तरंजन कोल्हटकर , दिनानाथ टाकळकर , जयमाला शिलेदार , सोनाली कुलकर्णी , भाग्यश्री देसाई , प्रकाश इनामदार त्याच प्रमाणे अनेक शिक्षण तज्ञ प्र. ल. गावडे , न. म. जोशी यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले . रौप्य महोत्सवी वर्ष धुमधडाक्यात साजरे झाले.
२०१७ पासुन या स्पर्धा महाराष्ट्र कलोपासक आणि नाटयसंस्कार कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने घेतल्या जातात . मंगेश शिंदे , राजन ठाकुर देसाई या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या विशेष प्रयत्नातुन या स्पर्धा अधिक भव्य प्रमाणात होत आहेत .   

दहा वर्षाखालील मुलांसाठी घेण्यात येणार्या या स्पर्धा महाराष्ट्रातील एकमेव आहेत .
या स्पर्धा जानेवारी महिन्यात होतात.  प्राथमिक शाळा बालभवन व रजिस्टर संस्थानां (सोसायटी )  यात भाग घेता येतो.

प्रवेश घेण्यासाठी आजच 8484930335 व्हाट्सएप मेसेज करा