Loading..

अभिनय प्रमाणपत्र अभासक्रम

नाटयसंस्कार कला अकादमी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रशिक्षण वर्ग सुरू केला आहे. बारावीनंतर कोणत्याही वयोगटाला म्हणजे आज्जी-आजोबा, नोकरदार वर्ग, स्वयंसेवक, गृहिणी या सर्वांना यात प्रवेश घेता येतो.

3 ते 4 महिने दर शनिवारी – रविवारी दुपारी २ ते ६ हे शिबिर घेतले जाते. यामध्ये आंगिक अभिनय, वाचिक अभिनय, व्यक्तीरेखा चित्रण, नाटय लेखन, दिग्दर्शन, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नृत्य, रंगमंच रचना, कॅमेरासमोर ऑडिशन याचे तंत्र इत्यादी गोष्टी प्रात्यक्षिकासह शिकवल्या जातात.

नाट्य, सिने सृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार , तंत्रज्ञ यात मार्गदर्शन करायला येतात
प्रशिक्षणानंतर सादरीकरण नाटयगृहात सादर केले जाते. या अभ्यासक्रमाच्या आतापर्यंत एकुण ४ बॅचेस यशस्वीपणे पार पडल्या. त्याचे व्हिडिओ शूटिंग करून नाटयसंस्कारच्या युट्युब चॅनल वर प्रसारीत केले आहे. ते सर्वांनी आवश्य बघावे.

सादरीकरणाला आणि त्यानंतरच्या तोंडी परीक्षेला विदयापिठाकडून परीक्षक येतात व परीक्षण करतात. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना नाटयसंस्कार कला अकादमी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे प्रमाणपत्र देण्यात येते.

प्रवेश घेण्यासाठी आजच 8484930335 व्हाट्सएप मेसेज करा