महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत पुणे केंद्रावर या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला .त्यानंतर एकांकिकेने महाराष्ट्रभर अनेक स्पर्धांमधून बक्षीस मिळवली. दोन वर्षात 40 च्या वर प्रयोग सादर केले. पुण्यात पालखीच्या मुक्कामावर वारकऱ्यांसमोर, गणेशोत्सवात सार्वजनिक सोसायटीत, कोजागिरी तर काही सामाजिक संस्थांसाठी प्रयोग केले. त्यातील महत्त्वाचा म्हणजे आनंदवन येथे दोन प्रयोग सादर केले .सातारा, कल्याण, अहमदनगर आणि महाराष्ट्रा बाहेर बेळगाव येथेही बालनाट्य संमेलनात ही नाटिका सादर झाली. लेखन दिग्दर्शन आणि अभिनय अशी अनेक बक्षिसे मिळाली.