Loading..

गजरा नाटयछटांचा

दिवाकर स्मृती नाटयछटा स्पर्धा 1992 सालापासून नाटयसंस्कार आयोजित करत आहे. त्यामधील पारितोषिक विजेत्यांची नाट्यछटा लेखन असेल तर पुस्तके प्रकाशन ,सादरीकरण असेल तर सुरुवातीला त्याच्या ऑडिओ कॅसेट आणि मग व्हिडिओ डीव्हीडी निर्मिती करणे. तसेच नाट्यछट्यांच्या प्रसारा करता नाटयछटा स्पर्धेपूर्वी प्रत्येक केंद्रावरती गत वर्षीच्या विजेत्यांच्या नाटयछटा सादरीकरणाचा एक कार्यक्रम सादर होत असे. त्याचे नाव गजरा नाट्यछटांचा गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या प्रकाराने सादर केला जातो. आता तर एका छोट्या नाट्यप्रवेशाच्या आधारे आजी आणि नातवंडांच्या संवादातून नाटयछटे बद्दल माहिती मिळते. आणि त्यातून गजरा नाटयछटांचा गुंफला जातो. चिंचवड येथे झालेल्या शंभराव्या अखिल भारतीय नाटय संमेलनात याचा प्रयोग झाला. उपस्थित प्रेक्षकांना तो खूप आवडला. यातून नाटयछटा म्हणजे काय आणि ती कशी करायची हे मनोरंजक रित्या  सांगितले जाते.