आजोबांच्या घरी रोबोट आणि परी या बालनाट्याचा पहिला प्रयोग 24 डिसेंबर 2019 सायंकाळी साडेपाच वाजता भरत नाट्य मंदिरात झाला या बालनाट्याची संकल्पना प्रकाश पारखी, लेखन राजश्री राजवाडे काळे, दिग्दर्शन अमोल जाधव शुभारंभाच्या प्रयोगात पाहुणी कलाकार म्हणून प्राजक्ता माळी हिने भूमिका केली आजोबांच्या गोष्टी या गाजलेल्या बालनाट्या नंतर कुमार गटासाठी काही परिकथा काही साहस कथा आजोबा मुलांना सांगत असतात आणि नाट्यरूप मागे दिसू लागते. जागतिक गाजलेल्या परिकथा सिंदबादच्या सफरी प्रमाणे साहसी सफर यात दाखवली होती