उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कार्यशाळा झाली की वर्षभर सातत्य नाही, सर्व गोष्टी विसरल्या जातात. वर्षभर सातत्य रहावं यासाठी रविवार सत्र आहे .
जुलै ते डिसेंबर दर रविवारी दुपारी 1 ते 5 या वेळात 3 – 3 महिन्यांच्या २ कार्यशाळा घेतल्या जातात. सहभागी प्रत्येकाला नाटयसंस्कार कला अकादमी यांचे प्रमाणपत्र देण्यात येते.
5 ते 8 आणि 9 ते 16 या दोन्ही वयोगटाकरता रविवार सत्र शिबिर घेतले जाते. याची सुरुवात नाटयछटा स्पर्धेने होते. मे महिन्यातील शिबिराप्रमाणेच छोट्या गटाला अभिनय गीत, कथाकथन, नाटयखेळ व मोठ्या गटाला लेखन, दिग्दर्शन, रंगभूषा, वेशभूषा, संगीत, प्रकाशयोजना, नृत्य यांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जाते.
तीन महिन्यानंतर व सहा महिन्यानंतर समारोपाला नाट्यगृहामध्ये सादरीकरण केले जाते. त्याचे व्हिडिओ शूटिंग करून नाटयसंस्कारच्या युट्युब चॅनल वर प्रसारीत केले आहे. ते सर्वांनी आवश्य बघावे मागील सत्रांचे सादरीकरण सुध्हा युट्युब चॅनलवर वर पाहू शकता.