Loading..

प्रकाश पारखी

प्रकाश पारखी हे १९६५ पासून ‘नकलानगरी हा एकपात्री कार्यक्रम सादर करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्राबाहेर परदेशातही नकला नगरी या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण केले आहे. 1972 साली आम्ही आपले खुळोबा खुळोबा या चिं .त्र्यं. खानोलकर यांच्या बालनाट्यात प्रमुख भूमिका करून व्यावसायिक बालरंगभूमीवर प्रवेश केला. त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर लबाड लांडगा ,मंग्या गारूडी आणि जादूची पुंगी, चोर चोर पक्का चोर, भित्रा राजपुत्र ,बिन कपड्याचा राजा, डम डम डंबोला, येस वुई वॉन्ट चार्ली ,आईशप्पथ, या बालनाट्यांच्या अनेक प्रयोगात प्रमुख भूमिका साकारली. सर्वात गाजलेल्या आणि 22 वर्षे चाललेल्या ढब्बू ढोल रिमोट गोल या बालनाट्याचा नुकताच म्हणजे 27 नोव्हेंबर 2023 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शंभरावा प्रयोग झाला.
मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नाटय़ माध्यमाद्वारे निरनिराळे प्रयोग केले . प्रशिक्षण ,प्रयोग आणि प्रकाशन अशी त्रिसूत्री त्यांनी चळवळीमध्ये जपली. ‘नाटय़छटा’ हा प्रकार जीवित ठेवण्यासाठी दिवाकर नाट्यछटा स्पर्धा 1991 साली सुरू केली, आजही स्पर्धा सुरू आहे. आजवर या स्पर्धेत लाखो स्पर्धकांनी भाग घेऊन नाट्य चित्रपट क्षेत्रात यश मिळवले आहे. नाट्यछटा लेखनाच्या कार्यशाळा घेतल्या, नाट्यछटा लेखन स्पर्धा घेतल्या आणि त्यात हजारावर नाट्यछटा लिहिल्या गेल्या आणि त्याची अनेक पुस्तके प्रकाशित केली.(नाट्य प्रतिमा प्रकाशन). याचबरोबर दहा वर्षाच्या आतील मुलांसाठी दहा मिनिटाच्या नाटुकल्यांच्या स्पर्धा त्यांचे गुरु भालबा केळकर यांच्या नावाने सुरू केल्या 25 वर्षानंतर या स्पर्धा महाराष्ट्र कलोपासक नाटयसंसस्कार कला अकादमी संयुक्तमाने आजही सुरू आहेत. यानिमित्ताने दहा मिनिटाच्या नाटुकल्यांची पुस्तके ही प्रकाशित केली . दहा वर्षाच्या आतील मुलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात नाटुकल्यांची ही एकमेव स्पर्धासुरू आहे . नाटय़संस्कार कला अकादमी या संस्थेची स्थापना 1978 साली प्रकाश पारखी यांनी केली. नाटयसंस्कार कला अकादमी पुणे या संस्थेचे ते संस्थापक व प्रमुख विश्वस्त आहेत. या संस्थेच्या माध्यमातून अनेक नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा त्यांनी घेतल्या आणि व्यक्तिमत्व विकासासाठी हजारो विद्यार्थ्यांना नाट्य प्रशिक्षण दिले. आंतरराष्ट्रीय किर्तीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आजचा आघाडीचा अभिनेता सुबोध भावे, सक्षम कुलकर्णी ,अथर्व कर्वे असे अनेक कलाकार नाटयसंस्कारच्या कार्यशाळेतून घडले आहेत .अनेक विद्यार्थी चित्रपटाच्या अनेक क्षेत्रात चमकत आहेत .रंगभूषा वेशभूषा, नेपथ्य ,प्रकाशयोजना ,ध्वनी संकलन यात अनेक विद्यार्थ्यांनी आपले करियर घडवले तर अनेक विद्यार्थी डॉक्टर इंजिनिअर उद्योजक आहेत तर काही बांधकाम व्यावसायिक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहेत. काहींनी सामाजिक क्षेत्रात आपले योगदान दिले आहे .
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लि. पिंपरी येथे कार्यरत असताना (१९७८ ते २००७) प्रकाश पारखी यांना गुणवंत कामगार हा पुरस्कार राज्यपाल माननीय शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते 1987 साली मिळाला. नकलाकार, गुणवंत कामगार, बालनाट्य लेखक व दिग्दर्शक, नाटय मार्गदर्शक व्याख्याते, नाटय माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत करणारे, पथनाट्य लेखक व प्रशिक्षक, अभ्यास नाट्य चळवळीचे संकल्पक अशा वेगवेगळ्या भूमिकेत वावरले आहेत. प्रकाश पारखी हे महाराष्ट्र शासन अभ्यासक्रम समितीचे माजी सदस्य राहिले आहेत. अभ्यासक्रमामध्ये वर्ग नाट्यगृह ही संकल्पना मांडून ती लोकप्रिय केली. त्यापुढे जाऊन अभ्यास नाट्य स्पर्धा चळवळ म्हणून सुरू केली आणि आजही ती सुरू आहे. प्रकाश पारखी यांची २०१८ साली अखिल भारतीय नाट्य परिषद संलग्न बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. प्रकाश पारखी यांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यातील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार राज्य पुरस्कार(1987), बाल रंगभूमी कार्यगौरव उदय सिंह पाटील पुरस्कार (१९८६), सेंट्रल गव्हर्नमेंट कल्चरल कमिटी तर्फे ‘आर्टिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार, कला गौरव प्रतिष्ठान तर्फे नाट्य गौरव पुरस्कार(१९९८) पर्वती पुण्यभूषण पुरस्कार(२००८). अखंड नाट्यसेवा पुरस्कार(२०१२) आणि चित्तरंजन कोल्हटकर पुरस्कार (२०१९)अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे मिळाले. स्वानंद पुरस्कार (२०१४मिरज) वंचित विकास रानवारा तर्फे जीवन गौरव पुरस्कार, बालगंधर्व रंगमंदिर पुरस्कार (२०१४) बाळासाहेब भारदे पुरस्कार (२०१८ शेवगाव, जिल्हा अहमदनगर) महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेचाही पुरस्कार २०२१ , इंदिराबाई अत्रे पुरस्कार प्रभा अत्रे यांचे हस्ते नोव्हेंबर 2022.

प्रवेश घेण्यासाठी आजच 8484930335 व्हाट्सएप मेसेज करा