नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित नाट्य कार्यशाळा 2024
मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी 🎭 नाट्य प्रशिक्षण हे प्रभावी साधन आहे, हे लक्षात आल्यामुळे गेली 45 वर्ष सातत्याने नाट्य प्रशिक्षणाचे कार्य संस्थेने सुरू ठेवले आहे. TV serial मध्ये काम देऊ अशी कोणतीही खोटी आश्वासने न देता प्रत्येकाला वयोगटा नुसार नाट्यशास्त्राचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाते. अभिनयाचे महत्व विविध खेळांद्वारे प्रात्यक्षिकांद्वारे समजावून दिले जाते. जगाच्या रंगभूमीवर कोणतीही भूमिका प्रभावी करण्यासाठी नाट्यशास्त्र शिकणे गरजेचे आहे.
छोटा गट : ५ ते ८ वर्ष
छोटया गटातील मुलांना गमतीदार गाणी, गमतीदार गोष्टी आणि गमतीदार खेळ यांच्या साह्याने प्राथमिक नाट्यप्रशिक्षण हसत खेळत शिकवले जाते.
मोठा गट :९ते १६ वर्षे
नाट्यशास्त्रात प्रथम येतो तो म्हणजे अभिनय वाचिक आणि आंगिक.
आपला आवाज कसा तयार होतो इथपासून , त्याचा वापर कसा करावा, त्याची काळजी कशी घ्यावी, त्यासाठी कोणते व्यायाम करावेत हे सांगितले जाते . संपूर्ण शरीराची हालचाल त्यातील बारकावे शरीराचा उपयोग म्हणजेच देहबोली याचे महत्त्व सांगितले जाते. पण नाटक म्हणजे केवळ अभिनय नव्हे त्याचे लेखन कसे करावे दिग्दर्शन कसे करावे त्याच्या तांत्रिक बाजू कशा हाताळाव्यात या संदर्भात प्राथमिक माहिती दिली जाते .
🌟 रंगभूषा 🌟 वेशभूषा
🌟 नृत्य 🌟 प्रकाश योजना
🌟 शास्त्रिय संगीत
पार्श्वसंगीत
💫 नाट्य विषयाची नाट्यसंस्कार प्रथम परीक्षा शिबिरातच मोफत घेतली जाते.
आणि त्याची तयारी करून घेतली जाते
🌟 या कार्यशाळेच्यासमारोपाला सर्व विदयार्थ्यांचे नाटयगृहातील रंगमंचावर बालनाट्य सादर केले जाते.
( भरतनाटय मंदिर सदाशिव पेठ , यशवंतराव चव्हाण नाटयगृह कोथरुड , रामकृष्ण मोरे नाटयगृह चिंचवड )
मार्गदर्शक: प्रकाश पारखी व नाट्यसंस्कारचे अनेक मान्यवर सदस्य. संध्या कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी, आशिष तिखे, दिप्ती असवडेकर, राधीका देशपांडे, ओंकार देशपांडे, अंजली दफ्तरदार, संज्ञा कुलकर्णी, पुष्कर देशपांडे.
संस्थेची अधिक माहिती Natyasanskar kala academy या facebook page वर मिळेल. संस्थेच्या Youtube Channel वर मागील शिबिराच्या विदयार्थ्यांचा समारोप कार्यक्रम बघायला मिळेल.
नाट्य कार्यशाळा
पुण्यात 3 ठिकाणी
15 ते 29 एप्रिल 2024
स्थळ - मित्र मंडळ सोसायटीचे 'सरिता विद्यालय', पर्वती पायथा, पुणे.
लहान गट फी - 7000₹
मोठा गट फी - 9000₹,
१५ दिवस आधी फी भरल्यास सवलत
लहान गट फी - 6500₹
मोठा गट फी - 8000₹
1 मे ते 15 मे 2024
स्थळ - ग रा पालकर शाळा, प्रतिज्ञा हॉल मागे, कर्वे नगर.
*लहान गट फी - 8000₹
मोठा गट फी - 10,000₹
१५ दिवस आधी फी भरल्यास सवलत
लहान गट फी - 7500₹
मोठा गट फी - 9000₹
१९ मे ते २ जुन 2024
स्थळ – सुखीव्हिला चिंचवड
सर्व नाट्य कार्यशाळेसाठी
वयोगट : 5 ते 8 छोटा गट:
सकाळी - 10 ते 12
वयोगट: 9 ते 16 मोठा गट,
दुपारी - 12 ते 5
यावर्षीच्या नाटयकार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
पुढील नाटयशाळेत सहभाग घेण्यासाठी 8484930335 व्हाट्सएप मेसेज करा
16 एप्रिल ते 29 एप्रिल (सरिता विद्यालय)
२९ एप्रिल रोजी भरत नाट्य मंदिर येथे नाट्य कार्यशाळेचा समारोप सादरीकरण झाले
सर्वानी Video बघावा youtube वर comment व LIKE नक्की करा
5 ते 8 छोट्या गटातील 30 पेक्षा जास्त मुलांचा सहभाग असलेल्या ग रा पालकर , कर्वेनगर , पुणे. येथे झालेल्या या सुट्टीतील दुसऱ्या नाट्य कार्यशाळेचा समारोप गुरुवार दिनांक १६ मे रोजी सकाळी १० :३० वा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे येथे पार पडला.
8 ते १६ वयोगटातील 35 पेक्षा जास्त मुलांचा सहभाग असलेल्या स्थळ : ‘सुखी विला’ बंगला 7, पवना नगर, चिंचवड. येथे झालेल्या या सुट्टीतील तिसऱ्या नाट्य कार्यशाळेचा समारोप
रविवार दिनांक 2 जून दुपारी 12:30 स्थळ :- रामकृष्ण मोरे सभागृह , चिंचवड , पुणे येथे येथे पार पडला.