Loading..

नाटयसंस्कार तृतीय परीक्षा

नाट्यसंस्कार प्रथम व नाट्यसंस्कार द्वितीय परीक्षा दिल्यावर 12 वर्षांवरील कोणालाही परीक्षा देता येईल. ही परीक्षा 200 गुणांची आहे यापैकी 100 गुण लेखी परीक्षेला व 100 गुण प्रात्यक्षिक परीक्षेला आहेत.

लेखी परीक्षेसाठी

प्रारंभिक नाट्यशास्त्र या पुस्तकाच्या वारंवार वाचनाने त्याचा उपयोग प्रत्यक्ष नाटकात काम करताना होतो का हे परीक्षार्थीनी आजमावले पाहिजे.

  • त्या करिता या पुस्तकातील पाठांवर आधारित काही प्रश्न असतील.
  • तसेच एक कथा दिली जाईल त्याचे नाट्यरूपांतर लिहायचे आहे.
  • नाटकाची कथा सांगता येत असेल तर कथेचे नाट्यीकरण करता येते का? हा विचार कुमार वयात करता आला पाहिजे.
  • यातून त्याच्यामध्ये लपलेला सुक्त लेखक बाहेर पडण्याची शक्यता आहे.
  • तसेच आयुष्यात सुद्धा संवादाला महत्त्व आहे सुसंवादाने अनेक कामे होऊ शकतात.
  • कथेचे नाट्यीकरण लिहून झाल्यावर सादर करण्यासाठी त्याच्या मनात एक चित्र तयार झाले पाहिजे व ते कागदावर उतरवता आले पाहिजे.
  • त्यासाठी त्या नाटकास आवश्यक रंगमंचावरील नेपथ्य व रचना याचे चित्र (रेखाचित्र, रंग नाही) काढता आले पाहिजे.
  • एखाद्या वस्तूची जाहिरात करण्याकरिता त्याचे संवाद लेखन करता येते का? याचा विचार करून संवाद लिहिता आला पाहिजे.
अशा या चार मुद्द्यांसाठी 100 गुणांची लेखी परीक्षा आहे. या परीक्षेला तीन तास वेळ दिला जाईल.

प्रात्यक्षिक परीक्षेसाठी

सादरीकरण - अभिनय - * 5 ते 10 जणांचा गट करून त्यांना एक कथा देऊन 25 मिनिटे विचारासाठी दिली जातील नंतर एकेका गटाला 5 मिनिटांचे नाटुकले सादर करायचे आहे. त्यातील अभिनयासाठी 30 गुण देण्यात येतील

नेपथ्य - 1/2 तासात रंगमंच नमुना (मॉडेल) तयार करायचा आहे. यामध्ये मुलांना उपलब्ध साहित्यातून रंगमंचाची छोटी प्रतिकृती तयार करण्यास सांगितले जाईल. त्यामुळे रंगमंचाचा आकार कसा असतो, विंग्स कुठे असतात. एखादा देखावा तयार करताना उदा. घर असेल तर दरवाजा, खिडकी कसे दाखवता येतील हा विचार करता त्याला करता येतो का? हे कळेल. यासाठी 20 गुण आहेत.

पार्श्वसंगीत - विद्यार्थ्यांना काही संगीताचे नमुने ( पिसेस ) ऐकवले जातील. त्या संगीतानुसार त्याचा भाव ( मुड ) कोणता आहे? त्यावर प्रश्न विचारले जातील. त्यासाठी 20 गुण आहेत.

प्रकाश योजना - उपलब्ध वस्तूंचा उपयोग प्रकाश योजनेसाठी कशाप्रकारे करता येईल? यासाठी 20 गुण आहेत.

एकूण प्रभाव

यासर्व प्रात्यक्षिक मुद्द्यांवरून सारासार विचार करून विद्यार्थ्यांना एकूण प्रभावासाठी 10 गुण दिले जातील.

प्रवेश घेण्यासाठी आजच 8484930335 व्हाट्सएप मेसेज करा